वृत्तसस्था /मुंबई
भारताचे डिजिटल मॉर्गेजचे मार्केट फेसबुकसह शाओमीसारख्या कंपन्यांसाठी आता एका मोठय़ा स्पर्धेचं ठरणार आहे. साधारणपणे काही प्लेयर्स 75 लाख कोटी रुपयाच्या व्यवसायात आपले पाय ठेवण्यास प्रारंभ करण्याच्या तयारीत आहेत. भारत हा पहिला देश होऊ शकतो की जिथे फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर कर्ज उपलब्ध होणार असल्याचेही फेसबुकने स्पष्ट केले आहे.
गुगलच्या माहितीनुसार लघु उद्योग कर्ज उपलब्ध करण्याच्या रुपाने याची सुरूवात होणार आहे. यामध्ये हे कर्ज कोलॅटरलच्या विना 17 ते 20 टक्के दराने मिळणार आहे. यासह पाच लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार असल्याचे प्रेस बिलीफ ऑफ इंडियाचे भारतामधील प्रमुख मनु जैन यांनी दाखला देत सांगितले आहे.
कोरोना काळात डिजिटल देवाणघेवाण तेजीत राहिली आहे. यातील बहुतांश कर्जांमध्ये वृद्धीनंतर पारंपारिक बँका जागृत झाल्या असल्याचे दिसून आले आहे. भारताच्या डिजिटल फंड बाजारात काही मोठय़ा टेक कंपन्या आपल्याकडे आक्रर्षित करत आहेत. बोस्टन कन्सल्टिंग समूहाच्या माहितीनुसार डिजिटल लेंडिंगचा बाजार 2023 पर्यंत तीन पटीने वाढून 350 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती आहे.
बँकांसोबत भागीदारीची योजना
सध्या शाओमी ही कंपनी यासंदर्भात योजना आखत असून देशातील काही मोठय़ा बँका आणि स्टार्टअप डिजिटलसोबत करार करणार आहे. याअंतर्गत कर्ज, डेबिट-क्रेडिटकार्ड आणि विमा व्यवसायाची सेवा देणार असल्याची माहिती आहे.