ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
घाऊक ग्राहकांना विकण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल पंपावर विकल्या जाणाऱ्या किरकोळ डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर घाऊक ग्राहकांना विकण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. कारण या महिन्यात पेट्रोल पंपावरील डिझेल विक्रीत 20 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. बस फ्लीट ऑपरेटर आणि मॉल्ससारख्या मोठय़ा ग्राहकांनी पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी केले. सहसा ते थेट पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन घेतात. यामुळे इंधन रिटेलिंग कंपन्यांचा तोटा वाढला. परिणामी अशा मोठय़ा ग्राहकांना विकण्यात येणाऱया घाऊक डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 रुपयांची वाढ करण्यात आली.
मुंबईत घाऊक ग्राहकांसाठी डिझेलचा दर 122.05 रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर पेट्रोल पंपांवरील दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीतील घाऊक किंवा औद्योगिक ग्राहकांसाठी डिझेल 115 रुपये प्रतिलिटर आहे. तर पेट्रोल पंपावर 86.67 रुपये प्रतिलिटर आहे.