पत्रे बसविण्याचे काम दोन दिवसात पूर्ण करण्याची सूचना : सदाशिवनगर स्मशानभूमीतील समस्यांची आमदार बेनके-मनपा आयुक्त रूद्रेश घाळी यांच्याकडून पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
सदाशिवनगर स्मशानभूमीतील अंत्यविधी शेडचे पत्रे खराब झाले असून कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे स्मशानभूमीसह बंद असलेल्या डिझेल शवदाहिनीचे परिवर्तन करण्यासाठी तज्ञ कंत्राटदाराकडून माहिती घेण्याची सूचना मनपा अभियंत्यांना केली. शेडवरील पत्रे बसविण्याचे काम तातडीने करण्याचा आदेश आमदार अनिल बेनके यांनी मनपा आयुक्तांना दिला.
सदाशिवनगर स्मशानभूमीतील समस्यांची पाहणी सोमवारी महापालिका आयुक्त रूद्रेश घाळी आणि आमदार अनिल बेनके यांनी केली. 45 लाखाचा निधी खर्च करून डिझेलवर चालणारी शवदाहिनी बसविण्यात आली आहे. पण तीन वर्षे होत आली तरी शवदाहिनी वापराविना धूळखात पडली आहे. त्यामुळे गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव आहे. परिवर्तनासाठी लागणारे साहित्य आणि यंत्रोपकरणाचे दर जाणून घेण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. पण सदर निविदा प्रक्रिया एका ठराविक कंपनीच्या एस्टिमेटच्या आधारे मागविण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया संशयाच्या फेऱयात अडकली आहे. त्यामुळे आमदार अनिल बेनके यांनी पाहणीवेळी डिझेलवर चालणाऱया शवदाहिनीच्या स्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच विजेवर चालणाऱया शवदाहिनी कधीपासून बंद आहे, याची विचारणा केली. अंत्यविधीसाठी डिझेल शवदाहिनीकरिता 60 लिटर डिझेल लागत असून अंत्यविधीसाठी पाच तासाचा अवधी लागत आहे. त्यामुळे गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता निविदा प्रक्रिया मागविण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱयांनी
दिली.
स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथऱयावरील शेडचे पत्रे खराब झाले असून पत्र्याचे तुकडे पडत आहेत. त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी येणाऱया नागरिकांच्या अंगावर पत्रे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. सदर पत्रे बदलण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत ‘तरुण भारत’ने देखील पाठपुरावा केला होता. याची दखल घेवून आमदार अनिल बेनके यांनी महापालिका आयुक्त रूद्रेश घाळी यांच्यासमवेत पाहणी केली. पत्रे खराब झाले असून खुपच धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर पत्रे बदलण्याचे काम तातडीने हाती घेण्याची सूचना आमदार अनिल बेनके यांनी महापालिका आयुक्तांना केल्या. सदर काम येत्या दोन दिवसात सुरू करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी सहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे यांना बजावला.
80 लाखात नवीन शवदाहिनी बसविणे शक्य
परिवर्तनासाठी म्हैसूरच्या कंत्राटदाराने 80 लाखाचे एस्टिमेट दिले असून दुसऱया एका कंत्राटदाराने 30 लाखाचे एस्टिमेट दिले आहे. इतका फरक कसा? असा मुद्दा आमदार अनिल बेनके यांनी उपस्थित केला. परिवर्तन करण्याऐवजी 80 लाखात नवीन शवदाहिनीच बसविणे शक्मय आहे. त्यामुळे तज्ञ कंत्राटदाराकडून माहिती घेवून शवदाहिनीचे परिवर्तन करून सुरू करण्याची सूचना महापालिका आयुक्त रूद्रेश घाळी आणि सहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे यांना केली.