बेळगाव : तांत्रिक शिक्षण विभागाकडून डिप्लोमाच्या मागील परीक्षाही घेण्याचा विचार केला जात आहे. परंतु यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्यावरील दडपण वाढले आहे. कोरोनामुळे इतर परीक्षा रद्द करण्यात आल्या असताना डिप्लोमाच्या मात्र मागील सेमिस्टरच्याही परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे. या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी ऑल इंडिया डेमोपेटिक स्टुडंट ऑर्गनायझेशनने (एआयडीएसओ) निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. सोमवारी डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडोंच्या संख्येने डिप्लोमाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन परीक्षा रद्द करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱयांच्यावतीने महसूल अधिकारी एस. एम. परगी यांनी निवेदन स्वीकारले. डिप्लोमाच्या पहिल्या, तिसऱया व पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. युजीसीच्या नियमानुसार होऊन गेलेल्या परीक्षा रद्द करून पुढील परीक्षा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. परंतु, कर्नाटक राज्य सरकारकडून या परीक्षा घेण्यासाठी तयारी केली जात आहे. याला विद्यार्थ्यांचा विरोध असून परीक्षा तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राजू गानगी, वैभव सुतार, विनायक मरकट्टी यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
Previous Article‘त्या’ पीडीओला बिजगर्णी ग्रामस्थांचा विरोध
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.