हिंडलगा : हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया डिफेन्स कॉलनीतील रस्ताकामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर होते.
शासनाच्या आरडीपीआर फंडातून मंजूर झालेल्या निधीतून सदर रस्त्याचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती उद्घाटनप्रसंगी देण्यात आली. त्यानंतर ज्ये÷ नागरिक प्रकाश शेलार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्या स्नेहल कोलेकर, शशी शेलार, शरद शेलार, रेखा हिरोजी, संगीता शेलार, आशा शेलार, डी. वाय. तगरे, संतोष पिल्ले, कॉन्ट्रक्टर बाळकृष्ण तरळे, बी. जी. पाटील यांच्यासह परिसरातील रहिवासी उपस्थित होते.