मुंबई
डिमार्ट चालवणाऱया अव्हेन्यू सुपरमार्केटस्ने सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत महसूलात 46 टक्के वाढ दर्शवली असल्याचे दिसून आले आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीने 7 हजार 649 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. याआधीच्या वर्षात समान कालावधीत कंपनीने 5 हजार 218 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. 30 सप्टेंबरअखेर कंपनीची देशभरातील एकूण स्टोअर्सची संख्या 246 इतकी राहिली आहे.