नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी गोदरेज अप्लायन्सेस डिशवॉशरच्या विक्रीसाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे. देशभरातील विक्री केंदांमध्ये डिशवॉशरची उपलब्धता करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये डिशवॉशरच्या मागणीमध्ये मोठी वाढ दर्शविली गेली होती. या मागणीची दखल घेऊन गोदरेज अप्लायन्सेसने देशभरातील विविध शहरांमध्ये डिशवॉशरची उपलब्धता आगामी काळामध्ये करण्याचे ठरविले आहे. वर्षाला भारतामध्ये एक लाखाहून अधिक डिशवॉशरची विक्री होते.