स्टार एअरकडून प्रयत्न सुरू : देशातील 10 शहरांना थेट विमानसेवा
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव ते सुरत या विमान सेवेसाठी स्टार एअरने प्रयत्न सुरू केले आहेत. नोव्हेंबर 10 पासून ही विमानसेवा सुरू होणार होती. परंतु अंतिम मंजुरी अद्याप मिळालेली नसल्याने डिसेंबर अखेरपर्यंत बेळगाव-सुरत विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे बेळगावच्या व्यापाऱयांना तासाभरात विमानाने सुरत शहराला पोहोचता येणार आहे.
स्टार एअरच्या ताफ्यात आणखी एक विमान दाखल होणार आहे. हे विमान दाखल झाल्यानंतर बेळगावमधून सुरतला विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर अन्य एका शहरालाही विमानसेवा सुरू करण्यासाठी स्टार एअरने नागरी उड्डाण मंत्रालयाकडे प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र सरकारच्या उडान-3 अंतर्गत विविध मार्ग मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी बेळगाव-सुरत हा मार्ग स्टार एअरसाठी मंजूर करण्यात आला होता. उडान-3 मुळे सर्वसामान्यांना विमान प्रवास करणे सहज शक्मय झाले आहे. कमी तिकीट दरात देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानाने प्रवास करता येत आहे. बेळगाव ही व्यापारी पेठ असल्यामुळे कपडे तसेच इतर खरेदीसाठी बेळगावच्या व्यापाऱयांची सुरत शहराला ये-जा असते. त्यामुळे या विमानसेवेला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अजमेरलाही विमानसेवा उपलब्ध बेळगाव ते सुरत व सुरत ते अजमेर असा प्रवास बेळगावच्या प्रवाशांना करता येणार आहे. यामुळे अजमेर दर्ग्याला जाणाऱया भाविकांना विमानसेवेने प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे. स्टार एअरने लवकरच सुरत व अजमेर या दोन शहरांना विमानसेवा सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काही दिवसात बेळगावमधून देशभरातील एकूण 10 शहरांना थेट विमानसेवा सुरू होणार आहे.
अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण होणार डिसेंबर अखेरपर्यंत स्टार एअरचे बेळगाव ते सुरत व सुरत ते किशनगड (अजमेर) ही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे बेळगावच्या व्यापाऱयांना थेट सुरतचा प्रवास करता येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून असणारी मागणी अखेर पूर्ण होत असल्याचे बेळगाव विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांनी सांगितले.