वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोविड 19 च्या संकटाला थोपविण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करत आहेत. परंतु या महामारीनंतर जागतिक पातळीवर खूप आश्वासक बदल होण्याचे संकेत आहेत. यात समाजिक अंतर, आर्थिक प्रश्न यासोबत नवीन बदलत्या नियमांची सवय प्रत्येकालाच करुन घेण्याची गरज निर्माण होणार आहे. यात पर्यटन, ट्रव्हल्ससह अन्य निवडक व्यवसायांचा प्रवास येत्या डिसेंबरपर्यंत संथ राहणार असल्याचे संकेत तज्ञांकडून दिले जात आहेत.
कोविड 19च्या संकटामुळे ट्रव्हल क्षेत्राचा प्रवास थंडावल्याने खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील प्रवासांमधून मिळणाऱया महसूलाचा आकडा मोठय़ा प्रमाणात घसरला आहे. यातील सुधारणात्मक आकडेवारी येत्या डिसेंबरपर्यंत तरी पहावयास मिळण्याची आशा धुसर असल्याचेही विविध अहवालातून संकेत मिळत असल्याने पुढील काही दिवस ट्रव्हल क्षेत्राचा प्रवास अगदी संथपणे सुरु राहणार असल्याचा अंदाज आहे.
विविध प्रकारच्या प्रवासांमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्यामध्ये जिल्हय़ापासून ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासाची परिभाषा मोठय़ा प्रमाणात बदलणार आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेचा वेग खूप मंद राहणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पर्यटन व्यवसाय क्षेत्राला मोठय़ा प्रमाणात धोक्मयाची घंटा राहणार असून यातील आंतरराष्ट्रीय प्रवासांमध्ये अधिकची घट होणार असल्याचे संकेत व्यक्त होत आहेत.
ट्रव्हल्स क्षेत्रात नव्या बदलाचे संकेत
कोविड 19 नंतर विमानातून येणाऱया प्रवाशांचे स्वागत हे पहिल्यासारखे केले जात नाही. आरोग्य तपासणी व अन्य चाचण्यांना सामोरे जावे लागते आहे. टॅव्हल व्यावसायिकांना अनेक बदल करावे लागणार आहेत.
नियमासोबतच पुढील गोष्टींवर जोर देण्यावर विचार केला जात आहे. अशा प्रकारच्या अनेक बदलांचा येत्या काळात ट्रव्हल्स क्षेत्राला स्विकार करावा लागणार असल्याचे प्रवास क्षेत्रातील अभ्यासकांनी म्हटले आहे.