ट्रक्टर विक्री उच्चांकी : कोरोनानंतर वाहन क्षेत्र रुळावर येण्याचे संकेत : मारूती सुझुकी, महिंद्रा, एस्कॉर्टस्च्या वाहनांना मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहन निर्मितीसाठी 2020 हे वर्ष खूप अडचणीचे राहिले आहे. कारण महामारीच्या कारणामुळे वाहन उद्योगात मोठा चढउतार राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु यातूनही वाहन क्षेत्राने तेजी मिळवत आपली कामगिरी मजबूत केल्याचे पहावयास मिळाले आहे. डिसेंबर 2020 मध्ये वाहन कंपन्यांनी विक्रीत समाधानकारक कामागिरी प्राप्त केली आहे. यामध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्राच्या वाहनांनी 25 टक्क्यांची वाढ नोंदवली असून अशा विविध कंपन्यांनी आपली तेजी कायम राखली आहे.
मारुतीची विक्री 20 टक्क्यांनी तेजीत
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने डिसेंबर 2020 मध्ये कॉम्पॅक्ट वाहने, एलसीव्ही आणि व्हॅनसह एकूण 1,60,226 युनिट्सची विक्री केली. देशातील सर्वात मोठय़ा वाहन निर्मात्या या कंपनीने मागील वर्षात समान महिन्यात 1,33,296 युनिट्सपेक्षा 20 टक्क्यांची अधिक विक्री केली आहे.
महिंद्रा ऍण्ड महिंद्राची विक्री मजबूत
डिसेंबर 2020 मध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्राची विक्री ही 35,187 सोबत 10.3 टक्क्यांच्या घसरणीसह राहिली होती. मागील वर्षातील समान कालावधीत कंपनीने 39,230 युनिट वाहन विक्री केली होती. एकूण प्रवासी वाहनांची विक्री मात्र 16,182 युनिट्ससोबत 3 टक्क्यांनी वधारली आहे.
एस्कॉर्ट्सची विक्री वर्षाच्या आधारे 90 टक्क्यांनी तेजीत
एस्कॉर्ट्स लिमिटेडची डिसेंबरमध्ये 88 टक्क्यांच्या वाढीसोबत एकूण ट्रक्टर विप्री 7,733 वर राहिली होती. जी महिन्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक विक्रमी विक्री राहिल्याची नोंद केली आहे. मागील वर्षात याच कालावधीत एकूण ट्रक्टर विक्री 4,114 इतकी राहिली आहे. वर्षाच्या आधारे पाहता वार्षिक वाढ ही 90 टक्के राहिली आहे.
व्होल्वो आयशरच्या वाहन विक्रीत घसरण
व्होल्वो आयशर यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2020 मध्ये त्यांची वाहन विक्री 3 टक्क्यांनी घसरुन 4,892 वर राहिली आहे. देशातील बाजारात वाहनांची मागणी कमी राहिल्यानेच कंपनीच्या वाहन विक्रीत घट नोंदवली आहे.
एमजी मोटर्सने नोंदवली 33 टक्के वाढ
एमजी मोटार इंडियाने 4,010 युनिट्सच्या विक्रीसोबत 33 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत ही विक्री 3,021 युनिटवर राहिली आहे.