बेळगाव विमानतळाची भरारी : दररोज 1200 च्या जवळपास प्रवाशांची संख्या : स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावमधून आता 10 शहरांना थेट विमानसेवा सुरू आहे. अन्य 2 शहरांना कनेक्टिंग विमानांची सोय उपलब्ध असल्याने प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दररोज 1200 ते 1300 प्रवासी बेळगावमधून ये-जा करीत असल्याने डिसेंबर महिन्यात 34 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. कोरोनानंतर विमानतळाने घेतलेल्या भरारीने राज्यात तिसऱया क्रमांकावर बेळगाव विमानतळ पोहचले आहे.
सर्वसामान्यांना विमान प्रवास करता यावा यासाठी केंद्र सरकारने ‘उडान’ ही योजना आखली. या अंतर्गत कमी दरामध्ये तिकीट उपलब्ध होत असल्यामुळे प्रवाशांना कमी दरात विमान प्रवास शक्मय झाला. यापूर्वी केवळ श्रीमंत नागरिकच विमान प्रवास करीत होते. परंतु उडानमुळे सर्वसामान्यही आता विमान प्रवास करू लागले आहेत. उडान-3 मध्ये बेळगावचा समावेश झाला. त्यामधून देशातील अनेक मार्गांवर विमानसेवा सुरू केली गेली.
अलायन्स एअर कंपनीची विमानसेवा पुणे व बेंगळूर, स्टार एअरकंपनीची सेवा बेंगळूर, मुंबई, सुरत, इंदूर, अजमेर, ट्रुजेट कंपनीची सेवा हैद्राबाद, तिरुपती, कडाप्पा, म्हैसूर, चेन्नई, इंडिगो कंपनीची सेवा बेंगळूर, हैद्राबाद, स्पाईस जेट कंपनीची मुंबई व हैद्राबाद या शहरांना विमानसेवा देण्यात येत आहे. या शहरांना अवघ्या काही तासांमध्ये पोहचता येत असल्याने प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ होताना दिसत आहे.
बेळगावमधून विमान प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात ती 34 हजारांचा आकडा पार करील, अशी शक्मयता बेळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे बेळगावच्या विकासाला चालना मिळत असून, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.