नवी दिल्ली
एप्रिल-डिसेंबर 2020-21 या काळात भारतात 40 टक्के इतकी वाढीव थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. 51.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक दरम्यानच्या काळात भारतात झाल्याचे सांगण्यात येते. भारतात पहिल्या 9 महिन्याच्या काळात 67.54 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली असून मागच्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 22 टक्के गुंतवणूक वाढली आहे. डिसेंबरमध्ये 9.22 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली असून जी 24 टक्के अधिक आहे. थेट विदेशी गुंतवणूकीबाबत सरकारने उचललेली पावले यासाठी कारणीभूत ठरली आहेत.