संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) कोराना विरोधात लढणाऱया वैद्यकीय तसेच आरोग्य कर्मचाऱयांच्या बचावासाठी बायो सूट तयार केला आहे. डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी वैयक्तिक सुरक्षा उपकरणांच्या निर्मितीकरता टेक्सटाईल, कोटिंग आणि नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करत बायो सूट तयार केला आहे. या सूटचे व्यापक प्रमाणात उत्पादन करण्याची तयारी सुरू आहे. या सूटच्या डीआरडीओने अनेक चाचण्या घेतल्या आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून निश्चित सुरक्षा मापदंडांपेक्षाही अधिक सुरक्षा या सूटमुळे प्राप्त होणार आहे. डीआरडीओने कोरोना संसर्गाच्या विरोधात प्रभावी बचावासाठी तयार केलेल्या सूटला गुणवत्तापूर्ण ठरविले आहे. या सूटचे मोठय़ा संख्येत उत्पादन करण्याचा डीआरडीओकडून प्रयत्न सुरू असून याकरता खासगी कंपन्यांची मदत घेतली जात आहे.
Previous Articleलॉकडाऊन उठेपर्यंत मासेमारी बंद
Next Article तीन महिन्यांचा धान्य कोटा 8 रोजी देण्यात येणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.