ऑनलाईन टीम / पुणे :
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड आणि डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल यांनी जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 228 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सोसायटीचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, खेमराज रणपिसे, राजश्री ठकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याध्यापिका लीना तलाठी, मनिषा मिनोचा, ज्योती बोधे, स्मिता कुलकर्णी, माधुरी बर्वे यांचे विशेष सहकार्य लाभले. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाने संयोजन केले.