पिरामल एन्टरप्राईझेसने अधिग्रहणासाठी दिले 34,250 कोटी
मुंबई
दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या (डीएचएफएल) अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले आहे. पिरामल एन्टरप्राईझेसने डीएचएफएलला अधिग्रहणाकरीता 34,250 कोटी रुपये दिले आहेत. या प्रकारे डीएचएफएलचे विलीनीकरण पिरामल कॅपिटल ऍण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (पीसीएचएफएल) होणार आहे.
पिरामल एन्टरप्राईझेसने दिलेल्या माहितीनुसार डीएचएफएलच्या अधिग्रहणासाठी एकूण 38,000 कोटी रुपयाची रक्कम जमा केली असून यामध्ये 34,250 कोटी रुपये पिरामल कॅपिटल ऍण्ड हाऊसिंग फायनान्सने ही रक्कम रेख स्वरुपात दिली आहे. सदरच्या अधिग्रहणावेळी उपस्थित राहिलेल्यांपैकी 94 टक्के जणांनी पिरामलला पाठिंबा दर्शवला होता. विलीनीकरणानंतर डीएचएफएलचा संपूर्ण हक्क पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्सकडे राहणार आहे. कंपनी येणाऱया काळात आपल्या 10 लाख ग्राहकांना परवडणारे गृहकर्ज देण्यासाठी कटिबद्ध असणार आहे. कंपनीचे जाळे देशातील 24 राज्यांमध्ये आहे. 301 शाखांसह 2 हजार 338 कर्मचारी कंपनीत काम करत आहेत.