नवी दिल्ली
गृहकर्ज कंपनी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल)च्या विक्रीला हिरवा कंदील मिळाला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एसीएलटी) च्या मुंबई बेंचने पीरामल समूहाची ऑफर म्हणजे रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली आहे. परंतु सदरची मंजुरी ही एनसीएलएटी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर निश्चित होणार असल्याची माहिती आहे. पिरामल समूहाने डीएचएफएलने सर्व ट्रेंडिगदरम्यानच्या खरेदीसाठी 37,250 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. पिरामल समूहाच्या ऑफरला कमिटी ऑफ पेडिटर्स(सीओसी), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आयआरबी) आणि कॉम्पिटेशन कमीशन ऑफ इंडिया (सीसीआय) यांनीही मंजुरी दिलेली आहे.
आरबीआयचा प्रस्ताव
नोव्हेंबर 2019 रोजी आरबीआयने इनसोल्वंसी ऍण्ड बँकरप्सी कोडसह डीएचएफएलला दिवाळखोर घोषित करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. एसीएलटीच्या मुंबई शाखेतील डीएचएफएलची दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु आहे. कंपनीच्या संचालक मंडळाचा भंग करुन आर. सुब्रमण्यकुमारला प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
या कंपन्यांनी लावली होती बोली .डीएचएफएलला खरेदी करण्यासाठी अमेरिकेची ओकट्री, अदानी समूह आणि हाँगकाँगच्या एससी लोव्ही यांनीही बोली लावली होती.