नवी दिल्ली
दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल)ला मार्चला संपलेल्या तिमाहीत 97 कोटी रुपयांचा नफा झाला आहे तर याच तुलनेत कंपनीला मागच्या वषी याच कालावधीत 7 हजार 634 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. कंपनीने यावषी नफा मिळवत दमदार कामगिरी केली आहे. कंपनीचा सदरच्या कालावधीत महसूल 14 टक्के घटून 2 हजार 34 कोटी रुपयांवर आला आहे. याच तुलनेत मागच्या वषी समान अवधीत 2 हजार 387 कोटीचा महसूल प्राप्त करण्यात कंपनीला यश आले होते.