ऑनलाईन टीम / चेन्नई :
डीएमकेचे आमदार जे. अन्बझागन याचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. आज त्यांचा 62 वा वाढदिवस होता. कोरोनामुळे मृत्यू झालेले हे देशातील पहिलेच आमदार आहेत.
कोरोनाची लक्षणे आढळल्याने मागील आठवड्यात जे. अन्बझागन यांना रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
अन्बझागन हे डीएमके पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि चेन्नई पश्चिमचे सरचिटणीसही होते. कोरोना संकटात राज्यातील लोकांना मदत करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.