नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रातील कंपनी डीएलएफने चेन्नईत ओल्ड महाबलीपुरम येथे बांधकाम प्रकल्पाच्या विकासासाठी 100 कोटींची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. कंपनीने चेन्नईत 85 एकरचा प्लॉट घेतला असून त्यात 100 कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. यात 1500 प्लॉटस् असून 600 चौ. फू. ते 4 हजार चौ. फू. चे स्वतंत्र प्लॉटस् विक्रीसाठी असणार आहेत.