के. रत्नाकर शेट्टी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी / बेळगाव
के. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर संघाने साईराज वॉरियर्स संघाचा 4 गडय़ानी तर डीके लायन्सने साई स्पोर्ट्सचा सरासरी धावसंख्येच्या आधारे 8 धावानी पराभव केला. रोहित पोरवाल (साई स्पोर्ट्स) व स्वप्नील एळवे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना येथे रविवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साईराज वॉरियर्सने 20 षटकात 4 बाद 154 धावा केल्या. त्यात विठ्ठल हबीबने नाबाद 74, आदित्य कलपत्रीने 30 तर संतोष सुळगे पाटील, शुभम भादवणकर यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे रोहितकुमार एसीने 17 धावात 2 तर जिनत मुडलबागीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने 19.3 षटकात 6 बाद 158 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. त्यात स्वप्निल एळवेने 2 षटकार, 6 चौकारासह 90, प्रसाद सुगुरने 39 तर जिनत मुडलबागीने 12 धावा केल्या. साईराजतर्फे विठ्ठल हबीबने 20 धावात 3 तर नंदकुमार मलतवाडकरने 17 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात साई स्पोर्ट्सने 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. त्यात कर्णधार रोहित पोरवालने 4 षटकार, 8 चौकारासह नाबाद 89, मदन बेळगावकरने 24 तर विश्वनाथ एलिगारने 22 धावा केल्या. डीके लायन्सतर्फे केतज कोल्हापूरेने 22 धावात 2, राहुल बजंत्रीने 41 धावात 2 तर वासीम हुदली व डॉमनिय फर्नांडीसने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल डीके लायन्सने 6 षटकात 2 बाद 59 धावा केल्या होत्या. याचवेळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने संघटनेने डकवर्थ-लुईस नियमानुसार पहिल्या 6 षटकातील धावसंख्येच्या आधारावर डीके लायन्स संघाने 8 धावानी विजय संपादन केला. दर्शन पाटीलने नाबाद 29 तर प्रणय शेट्टीने 1 षटकार, 3 चौकारासह 23 धावा केल्या. साई स्पोर्ट्सच्या आनंद कुंभारने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे चेतन कोठारी, अभिषेक पाटील, नरेंद्र कोठारी, अन्वर दाक्षी यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल पवनकुमार हुबळी, सर्वाधिक षटकार विठ्ठल हबीब, इम्पॅक्ट खेळाडू विठ्ठल हबीब, सामनावीर स्वप्नील एळवे तर दुसऱया सामन्यात विनय तेरगाव, बाळू केरी, लक्ष्मीकांत शांती, बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल वासीम हुदली, सर्वाधिक षटकार रोहित पोरवाल, इम्पॅक्ट खेळाडू दर्शन पाटील, सामनावीर रोहित पोरवाल यांना चषक देऊन गौरविण्यात
आले.
सोमवारचे सामने : 1) लॉगर वि. झेवर गॅलरी सकाळी 9 वा., 2) साईराज वॉरियर्स वि. डीके लायन्स दुपारी 1.30 वा.