वृत्तसंस्था/ केपटाऊन
33 वर्षीय डीन एल्गार याचे दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावर लक्ष आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विद्यमान कसोटी संघाचे नेतृत्व सध्या डु प्लेसिस करीत आहे. डु प्लेसिसच्या जागी दुसऱया खेळाडूची कसोटी संघाच्या कर्णधारपदी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून लवकरच निवड केली जाणार आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेतर्फे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणाऱया इच्छूक खेळाडूंची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये मार्करेम, डी कॉक यांचा समावेश आहे. डु प्लेसिसच्या जागी डी कॉकची कसोटी संघाच्या कर्णधारपदी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून निवड केली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डी कॉक हा यष्टीरक्षक आणि फलंदाज अशी दुहेरी भूमिका बजावत आहे. त्यामुळे त्याच्यावर कसोटी कर्णधारपदाचे ओझे घालण्यासाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिका इच्छुक नसल्याचे समजते. येत्या जुलै महिन्यात विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. डीन एल्गारने यापूर्वी दोनवेळा दक्षिण आफ्रिका कसोटी संघाचे उपकर्णधारपद भूषविले आहे.