राजापूर/प्रतिनिधी
महावितरणच्या डिपीवर दुरूस्तीचे काम करत असताना वीज कर्मचाऱयाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला असल्याची घटना रविवारी सकाळी मुंबई गोवा महामार्गावर ओणी येथे पेट्रोलपंप समोर घडली आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव प्रकाश बाबू गमरे (वय 52 रा. ओणी ) आहे. ऐन शिमगोत्सवामध्ये ही घटना घडली असल्याने ओणी गावावर शोककळा पसरली आहे.