कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक महिनाभर तळ ठोकूनच
प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यात कोरोनाचा कहर वाढू नये, याकरता जेथे गर्दी होते अशा ठिकाणाचा सर्व्हे करुन आरोग्य विभागाच्यावतीने साताऱयातील डीमार्टमध्ये कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा कॅम्प गेले महिनाभर लावला गेला आहे. दररोज दीडशे स्वॉबची तपासणी केली जात असून हे स्वॉब घेण्यासाठी कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि दोन आरोग्य सेवक कार्यरत आहेत. दोन डोस घेतलेल्यांचेही नमूने घेतले जातात कारण तसेही अनेकजण बाधित आढळून आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
सातारा तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे. तपासण्या या गर्दीच्या ठिकाणी करण्यासाठी लसीकरण केंद्रांवर तपासण्या केल्या जात आहेत. सातारचे प्रांत मिनाज मुल्ला यांच्या सुचनेनुसार सातारा तालुक्यात जेथे जेथे गर्दी होणारी ठिकाणे आहेत. त्या ठिकाणांचा सर्व्हे केला गेला. त्यामध्ये डीमार्ट हे ठिकाण आले. या डीमार्टमध्ये अनेकजण खरेदीकरता येतात. तेथे कोरोना वाढण्याची शक्यता गृहीत धरुन आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱयांचा तेथे एक फिक्स कॅम्प लावण्यात आलेला आहे. या कॅम्पमध्ये स्वॉब तपासणी करण्यासाठी एक डॉक्टर आणि दोन आरोग्य सेवक यांची नेमणूक करण्यात आली असून दररोज दीडशे स्वॉब घेतले जातात. महिनाभरापूर्वीपासून तेथे टेस्टींग केले जात आहे.
कोरोनाची संख्या वाढू नये म्हणून टेस्टींग
कोरोनाची संख्या वाढू नये म्हणून साताऱयातील डीमार्ट येथे प्रत्येकजणांची आरटीपीसीआर घेतली जात आहे. दोन लसी घेतलेलेही पॉझिटीव्ह आढळून येत असल्याने त्यांचीही तपासणी केली जात आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव यांनी सांगितले.
कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रच का?
कण्हेंर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहता यांच्या कामाच्या बाबतीत जिल्हा परिषद सदस्य प्रतिक कदम, सभारती सरिता इंदलकर यांनी जास्त कौतुक केल्याने कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत शाहुपूरीसह शहरातील विलासपूर, संभाजीनगर याही भागात स्वॉब टेस्टींगचे कॅम्प राबवण्यात आले आहेत.
दररोज केल्या जात आहेत 150 टेस्ट
डीमार्टमध्ये दररोज दीडशे टेस्ट केल्या जात आहेत. एक महिन्यापासून स्वॉब तपासणी तेथे केली जात आहे. त्यामुळे तेथे नव्याने जाणाऱयांना हे जरा नवल वाटत असले तरी तेथे आर्वजून खरेदीला जातो तो टेस्ट करुनच घेतो. आतापर्यंत सुमारे 3 हजार टेस्ट झाल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.