नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) देशातील लसीची आयात वाढविण्यासाठी फायझर, मॉडर्ना यासारख्या परदेशी लसींचा भारतात येणाच्या मार्ग मोकळा केला आहे. फायझर आणि मॉडर्ना लसींना भारतात प्रवेश मिळण्याबाबतचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. आपात्कालीन वापरासाठी देशांनी आणि जागतिक आरोग्य संघटनेने मंजूरी दिलेल्या लसींच्या आयातीला वेग देण्याच्या प्रयत्नात कंपन्यांना भारतात ब्रिजिंग ट्रायलची आवश्यकता नसल्याचे डीसीजीआयने म्हटले आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे फायझर आणि मॉडर्ना यासारख्या परदेशी लसींना भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक चाचण्यांमधून सूट मिळण्यासाठी लस कंपन्यांनी सरकारकडे विनंती केली होती. डीसीजीआयने सांगितले की, त्यांनी या कंपन्यांसाठी लाँच नंतर ब्रिजिंग ट्रायलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. डीसीजीआयच्या एका पत्रात वीजी सोमानी यांनी म्हटले की, भारतात लसीकरण गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या लसींना जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी आहे, त्यांना आपल्या देशातसुद्धा आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली जाईल, असा मागील महिन्यात नियम करण्यात आला होता. पण यामध्ये काही अडचणी निर्माण होत होत्या. मात्र कंपन्यांनी ही भिती वाटत होती की, भारतामध्ये जर काही दुष्परिणाम झाले किंवा भारतात त्यांच्यावर आक्षेप घेतला तर त्याच्या संदर्भातील कायदेशीर कवच कंपन्यांना हवे होते. पण आता सरकारने अशी तयार दर्शवली आहे की, इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे कायदेशीर कवच देण्यात आले आहे, तशाच प्रकारचे संरक्षण त्यांना दिले जाईल. त्यामुळेच भारतात या लसी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.