नवी दिल्ली
इटलीतील बाईक निर्माती कंपनी डुकाटी यांनी आपल्या नव्या मॉन्स्टर व मॉन्स्टर प्लस बाईकच्या प्री-बुकिंगला भारतात सुरूवात केली आहे. सदरच्या नव्या गाडीसाठी आगाऊ बुकिंग करणाऱयांना 1 लाख रुपये भरावे लागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. नव्या मॉन्स्टरला जागतिक बाजारात मोठा प्रतिसाद लाभला आहे. नवी मॉन्स्टर आणि मॉन्स्टर प्लस या गाडय़ा भारतीयांना अनोखा आनंद नक्कीच मिळवून देईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.