वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
यजमान दक्षिण आफ्रिकेने येथे सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीत सोमवारी खेळाच्या तिसऱया दिवशी चहापानापर्यंत पहिल्या डावात 6 बाद 565 धावा जमविल्या असून त्यांनी श्रीलंकेवर 169 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डु प्लेसिसने शानदार शतक झळकविले. लंकेचा पहिला डाव 396 धावांवर समाप्त झाला होता.
दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 317 या धावसंख्येवरून सोमवारी खेळाला पुढे प्रारंभ केला आणि उपाहारापर्यंत त्यांनी 5 बाद 435 धावापर्यंत मजल मारली. या पहिल्या सत्रामध्ये दक्षिण आफ्रिकेने 118 धावांची भर घालताना एकमेव फलंदाज गमविला. उपाहारावेळी डु प्लेसिस 112 धावांवर खेळत होता. डु प्लेसिसचे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीतील हे पहिले कसोटी शतक असून त्याचे हे कसोटीतील दहावे शतक आहे. डु प्लेसिस आणि बेहुमा यांनी पाचव्या गडय़ासाठी 179 धावांची भागिदारी केली. खेळाच्या पहिल्या सत्रात कर्णधार डी कॉक डिसिल्वाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 18 धावा जमविल्या. उपाहारानंतर बेहुमा शनाकाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 7 चौकारांसह 71 धावा झळकविल्या. बेहुमा बाद झाल्यानंतर मुल्डेरने डु प्लेसिसला बऱयापैकी साथ देताना सहाव्या गडय़ासाठी 77 धावांची भर घातली. डिसिल्वाने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 36 धावा जमविल्या. नंतर केशव महाराजकडून डु प्लेसिसला साथ मिळाल्याने दक्षिण आफ्रिकेला चहापानापर्यंत 565 धावापर्यंत मजल मारता आली. डु प्लेसिस आणि केशव महाराज यांनी सातव्या गडय़ासाठी अभेद्य 90 धावांची भागिदारी केली आहे. केशव महाराज 1 षटकार आणि 4 चौकारांसह 43 तर डु प्लेसिस 23 चौकारांसह 177 धावांवर खेळत होते. लंकेतर्फे शनाका आणि डिसिल्वा यांनी प्रत्येकी 2 तसेच फर्नांडो आणि कुमारा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : लंका प.डाव-396, दक्षिण आफ्रिका प. डाव 6 बाद 565 (डु प्लेसिस 177, एल्गार 95, मार्करम 68, डय़ुसेन 15, डि कॉक 18, बेहुमा 71, मुल्डेर 36, केशव महाराज खेळत आहे 43, शनाका 2-92, व्ही फर्नांडो 1-115, डिसिल्वा 2-143, कुमारा 1-103).