फोंडा : चिखली येथे झालेल्या खुल्या नेव्ही विंडसर्फिग अजिंक्यपद स्पर्धेत गोव्याच्या डॅन कुएलो, किओना रजनी, आवेलीनो फर्नांडीस, पर्ल कोलवाळकर व आदर्श चुनेकरने सुवर्णपदक पटकावून निर्विवाद वर्चस्व मिळवले. गोव्याच्या या विंडसर्फसनी चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत आघाडी मिळवली होती. डॅन कुएलोने आर एस ः एक्स ऑलिम्पिक गटात सुवर्णपदक प्राप्त केले. दुखापत झाल्यानंतर परत स्पर्धेत उतरून त्यांनी ही शानदार कामगिरी केली. आर्मी यॉटींग नोडच्या इबाद अलीने रौप्य तर झेरोम कुमारने कास्यपदक मिळवले. किओना रजनीने आर एसः वन एशियन गेम्स गटात सुवर्णपदक पटकावले. टेक्नो 293 ओडी युथ ऑलिम्पिक गटात आवेलीनो फर्नाडीस व पर्ल कोलवाळकर यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. आदर्श चुनेकरने रेसबोर्ड युथ गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली.
Previous Articleगणतंत्रदिनी हिंसाचारामुळे देश दुःखी
Next Article जमशेदपूर एफसी-ओडिशा एफसी यांच्यात आज बांबोळीत लढत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.