प्रतिनिधी/ फोंडा
डोंगर, तरवळेöशिरोडा येथील श्री वाघ्रोसिद्ध देवस्थानचा मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा सोमवार 25 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानिशी साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त सकाळी श्रींस अभिषेक व इतर धार्मिक विधी, दुपारी आरत्या व महाप्रसाद होईल. पूजेचे यजमानपद सौ. पोर्णिमा व श्री. पांडुरंग यशवंत गावकर भूषवतील. सायंकाळी 7 वा. स्थानिक कलाकारांतर्फे भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री 10 वा. ‘रामान केले काम तात्याक काढलो घाम’ या कोकणी नाटय़प्रयोगाचे सादरीकरणाने सोहळय़ाची सांगता होईल. भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे देवस्थान समितीतर्फे कळविण्यात आले आहे.