रूग्णांची माहिती द्या अन्यथा कारवाई ः जिल्हा हिवताप कार्यालयाचा इशारा
कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
महापुरानंतर डेंग्यू, चिकनगुणीया रूग्णांत वाढ झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्याच सप्ताहात कोल्हापुरात डेंग्यूचे 13 तर चिकनगुणीयाचे 7 रूग्ण दिसून आले. ही संख्या यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. संशयित रूग्ण खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. त्यामुळे रूग्णसंख्या मिळत नाही, पर्यायाने डेंग्यू, उदेक असलेल्या भागात सर्वेक्षणात अडथळे येत आहेत. त्यामुळे संशयित रूग्णांची माहिती न दिल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा हिवताप कार्यालयाने दिला आहे.
जिल्हÎात ग्रामीण भागात 7 महिन्यांत हिवतापाचा एकमेव रूग्ण नोंद आहे. पण डेंग्यू, चिकनगुणीयाचे रूग्ण सातत्याने आढळत आहेत. बदलते वातावरण, दमट हवा, पाणी साठवण्यामुळे डेंग्यू पसरवणाऱया डासांत वाढ झाली आहे. अतिवृष्टी, महापुरानंतर किटक, डासांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेत डेंग्यू, चिकनगुणीया संशयित रूग्णांत वाढ झाली आहे. यामध्ये ताप कॉमन असल्याने कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे कोरोंटाईनच्या भीतीने संशयित रूग्ण खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. त्यामुळे रूग्ण अधिक असूनही त्यांची नेमकी आकडेवारी मिळण्यास हिवताप कार्यालयाला अडचणी येत आहेत.
ग्रामीण भागात 6 महिन्यांत डेंग्यूचे 30 रूग्ण दिसून आले, जुलैमध्ये ही संख्या 22 वर पोहोचली. ऑगस्टच्या पहिल्या आठवडÎात डेंग्यूचे 7 रूग्ण दिसून आले. शहरात 6 महिन्यांत डेंग्यूचे 41 रूग्ण दिसून आले. जुलैमध्ये डेंग्यूचे 42 रूग्ण आढळले. ऑगस्टच्या पहिल्या आठवडÎात डेंग्यूचे 13 रूग्ण दिसून आले. रूग्ण वाढले तरी हिवताप कार्यालयाकडे त्यांची नोंद होत नसल्याचे स्पष्ट आले आहे.
ग्रामीण भागात 6 महिन्यांत चिकनगुणीयाचे 13 रूग्ण दिसून आले. जुलैमध्ये 7 तर ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहात 2 रूग्ण आढळले. कोल्हापुरात 6 महिन्यांत 36 रूग्ण दिसून आले. जुलैमध्ये 12 रूग्णांची नोंद झाली. ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहात चिकनगुणीयाचे 7 रूग्ण उपचार घेत आहेत. मे, जून महिन्यात शहरी, ग्रामीण भागात डेंग्यू, चिकनगुणीया रूग्णसंख्या निरंक राहिली. हिवताप कार्यालयाकडून डेंग्यू उद्रेक झालेल्या भागात सर्वेक्षण, घरभेटी, औषध फवारणी करून त्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. पण खासगी डॉक्टरांकडून रूग्णांची माहितीच मिळत नसल्याने सर्वेक्षणात अडथळे येत आहेत. पर्यायाने साथ नियंत्रणावर मर्यादा आल्याची माहिती हिवताप कार्यालयातून देण्यात आली.
संशयित रूग्णांची माहिती द्या, अन्यथा कारवाई ः जिल्हा हिवताप अधिकारी
केंद्राने 2016 पासून डेंग्यू हा नोटीफायबल डिसीज घोषीत केला आहे. दमट हवामानामुळे डेंग्यू पसरवणाऱया डासांची पैदास अधिक आहे. शासकीय प्रयोगशाळेत होणाऱया तपासणीची नोंद हिवताप कार्यालयाला मिळते, पण खासगी डॉक्टर, लॅबमधील डेंग्यू रूग्ण तपासणीची माहिती मिळत नाही. संशयित रूग्णांची माहिती कार्यालयाला देणे बंधनकारक आहे, तरीही ती कळवली जात नसल्याने प्रतिबंधात्मक उपायात अडचणी येत आहेत. तरी खासगी डॉक्टर, लॅबनी डेंग्यू, संशयित डेंग्यू रूग्णांची माहिती तातडीने हिवताप कार्यालयाला कळवावी, dmokolhapur123@gmail.com या संकेतस्थळावर पाठवावी, माहिती न दिल्यास संबंधितांवर साथरोग कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे यांनी दिला आहे.