एमडीविरोधात मानहानीचा खटला
प्रतिनिधी / फोंडा
गोवा डेअरीची संजीवनी होऊ देणार नाही, प्रशासकांच्या कार्यकाळातही डेअरीत कसा गैरकारभार माजलेला हे उघड करीत असल्यामुळे आपल्या नावाची बदनामी एमडी अनिल फडते यांनी चालविलेली असल्याचा आरोप माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी केला आहे. आपल्या अध्यक्षीय कार्यकाळात एक पैशाचा घोटाळा झालेला नसून कोणत्याही कारवाईला तयार आहे. डेअरीच्या एमडीने आपल्या नावाची बदनामी केल्याप्रकरणी मानहानीचा खटला न्यायालयात दाखल करणार असल्याचा इशारा फळदेसाई यांनी कुर्टी फोंडा डेअरी परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
गोवा डेअरीचे एमडी फडते यांना आपल्याविरोधात बोलण्याचा कोणताच अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. दुध उत्पादक या नात्याने आपण मालक असे सांगून गोवा सरकारने डेअरीवर व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक केलेल्या अनिल फडते यांच्या नेमणूकीवरच अविश्वास निर्माण केला आहे.
आपली अध्यक्षीय कारकिर्द निष्कलंक-फळदेसाई
डेअरीत घोटाळा आपल्या अध्यक्षीय कार्यकाळात झाला नसल्याचा दावा त्यांनी केला असून यापुर्वीच्या अध्यक्षीय कार्यकाळात घोटाळा झाला की नाही? हे सांगण्यावर त्यांनी चुप्पी साधली. फळदेसाई यांनी आपली बाजू स्पष्ट करताना आपण डेअरीवर केलेल्या आरोपावर कोणती कारवाई झाली नसल्याचे सांगितले. डेअरीतील दुध चोरीप्रकरण, दुध पार्लर येथे केसकापणी, युरीया खरेदी, गायचे दुध म्हशीच्या दुधापेक्षा जास्त दरात खरेदी, मार्केट सर्व्हे न करता मका खरेदी अशा अनेक विषयावर डेअरीने सविस्तर माहिती द्यावी.
डेअरीने सर्व गैरप्रकारांचा खुलास करावा
डेअरीच्या म्हणण्यानुसार आप्टीजन हा युरीयासारखा पदार्थ हे हास्यापद असल्याचे मत फळदेसाई यांनी मांडले असून याप्रकरणी आपण चाचणी रिपोर्ट डेअरीला पुरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात ऑप्टीजन खरेदी प्रकरणी पौष्टिक तज्ञ समिती तेवढीच जबाबदार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. डेअरीने निमकोटेड युरीया पुरविणाऱया कंपनीशी कोणती कारवाई केली? आजच्या परिस्थितीत डेअरीत आपल्या मर्जीतील माणसांना वाहनांचे कंत्राट, दुध पुरविण्याऱया वाहनांचे कागदपत्रांची वैधता संपल्याची आढळली असून त्याच्यावर फक्त ताकिद देण्यापुरती कारवाई का? याप्रकरणी डेअरीची कर्मचारी हस्तक्षेप करणाऱयाविरोधात एमडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
एमडी अनिल फडते यांना पशासकीय अनुभव नसल्याचा दावा फळदेसाईने केला असून यापुर्वी त्यांनी जीएसटीमुळे पशुखाद्यात वाढ करावी लागत असल्याचे पत्र पाठवून गोंधळ निर्माण केला होता. अनिल फडते हे ज्येष्ठ वेटरनरी डॉक्टर असून त्याच्याविरोधात शेतकऱयांनी केलेल्या तक्रारीकडे प्रशासकाने कोणती कारवाई केली हे स्पष्ट करावे अशी मागणी केली आहे. डेअरीने केलेल्या सर्व आरोपाचे खंडन केले असून कागदोपत्री पुरावे सादर करून आपल्यावर आरोप करावे असे जाहीर आव्हान डेअरीचे प्रशासक व एमडी यांना केले आहे.
घोटाळयाचे खापर पौष्टीक आहार समितीवर का?
दरम्यान डेअरी अधिकारी डॉ. अजित कोसंबे यांच्यांशी संपर्क साधला त्यांनी त्याकाळी आपल्यासह डॉ. अनिल फडते व उदय गाड यांचा पौष्टीक आहार कमिटीत समावेश असल्याचे सांगितले. मात्र कोटन सिड एक्स्ट्रेशन खरेदीत सदर माल दुय़्यम दर्जाचा असून जनावरांसाठी योग्य नसल्याचा शेरा मारला होता. कोटन सिड खरेदी करण्यासाठी हरकत घेतली होती. पडताळणी व चाचणी अहवाल कमिटीने संचालक व एमडी सावंत यांना सादर केल्यानंतर अध्यक्षांनी नापसंती दर्शविली होती. त्यानंतर कमिटीच्या सदस्यांना पशुखाद्य कंपनीत जाण्य़ास मज्जाव केला नंतर कमिटीच बरखास्त करून टाकली. आपले ईस्पित साध्य झाल्यानंतर सर्व घोटाळय़ाचे खापर कमिटीच्या नावावर फोडण्याच हा प्रकार असल्याची माहिती दिली आहे. डेअरीतील घोटाळेखोरावर कारवाई करण्याचे सोडून दुसऱयावर बिनबुडाचे आरोप असा हा प्रकार असून यासंदर्भात सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. कोसंबे यांनी मांडले आहे. दोषींना कायमची अद्दल घडवून डेअरी स्वयंपुर्णतकडे वाटचाल करून डेअरी उत्पादकांना भरघोस नफा मिळवून देण्याकडे डेअरीचे प्रशासक वाटचाल करीत असल्याचा दावा डॉ. कोसंबे यांनी यावेळी केला.