ऑनलाईन टीम / पुणे :
दकनी अदब फाऊंडेशन आयोजित ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये दुसऱ्या दिवशी, शनीवारी ‘लोकजीवनगान’ या मराठी लोकसंगीताच्या कार्यक्रमाच्या रुपाने मराठमोळी शाहिरी गर्जली! पं. नेहरू सभागृहात शनीवारी दुपारी झालेल्या
‘लोकजीवनगान’ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
शाहीर डॉ. आझाद पापालाल नाईकवाडी आणि सुरेश कुमार वैराळकर यांनी हा कार्यक्रम सादर केला. शाहिरी गण, वासुदेव, वाघ्या मुरळी, गोंधळ , फटका, पोवाडा, ‘ ज्ञाती विसर्जनाची’ लावणी असे मराठी लोकसंगीताचे विविध भरजरी पदर त्यांनी जोरकसपणे सादर केले.
संयोजक मोनिका सिंग यांनी या कलाकारांचा सत्कार केला. तर नायकवडी यांनी फेस्टिव्हल संयोजकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ चित्राची प्रत भेट दिली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदाना वरील पोवड्याने कार्यक्रमाचा समारोप झाला. जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर उपस्थित होते.