प्रतिनिधी / बांदा:
श्री देवी माऊली मंदिर डेगवे येथे मुंबई येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. कीर्तनकार श्री कैलास खरे यांचे उद्या गुरुवारी दुपारी अडीच वाजता कीर्तन होणार आहे. सदर कीर्तनाचा कार्यक्रम उमाळकर बंधू मोयझर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आला आहे. तरी कीर्तन प्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डेगवे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.