एका तासाला 30 हजार रुपयांचे शुल्क
ब्रिटनमधील एक मॉडेल युवकांना मुलींसोबत कशाप्रकारे चॅट केले जावे याची टय़ूशन देत आहे. मुलींसोबत कशाप्रकारे बोलावे याचे धडे देण्यासाठी ती 30 हजार रुपये प्रतितास या दराने शुल्क आकारत आहे. 2006 मध्ये ती लंडनच्या एका क्लबमध्ये बसलेली असताना तिच्या जीवनात युटर्न घडला आणि तेव्हापासून ती याप्रकारची टय़ूशन देत आहे.
या महिलेचे नाव केजिया नोबल असून ती डेटिंग आणि अट्रक्शन एक्सपर्ट आहे. तिने वयाच्या 15 व्या वर्षीच शिक्षण सोडले होते. अनेकदा कोचिंग देत असताना युवक तिलाच डेट करू इच्छिण्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. तर कोचिंग घेत असलेल्या लोकांनीच तिच्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न प्रकारही अनेकदा घडला आहे.
लंडनमध्ये एका क्लबमध्ये बसलेली असताना एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि माझा फोन नंबर मागून एक प्रस्ताव दिला. सिंगल युवकांना चॅट करण्यासाठी फीडबॅक देऊ शकतेस का असे त्याने विचारले होते. संबंधित व्यक्ती एक बूटकँप चालवित होता. या बूटकँपमध्ये कशाप्रकारे महिलांसमोर आत्मविश्वासाने बोलावे हे पुरुषांना शिकविले जाते. केजिया आता 41 वर्षांची असून आतापर्यंत अनेक पुरुषांना तिने टय़ूशन दिली आहे.
पर्सनल डेव्हलपमेंट कोचिंग इंडस्ट्रीचा आकार 9 अब्ज रुपयांपेक्षाही अधिक आहे. या क्षेत्रात महिलांची कमतरता असल्याची जाणीव वर्षभरातच झाली होती. महिलांची मानसिकता सांगणाऱया महिलांचा या क्षेत्रातील सहभाग खूपच कमी असल्याचे केजियाने सांगितले आहे. केजियाने आता स्वतःचे युटय़ूब चॅनेलही सुरू केले आहे. या युटय़ूब चॅनेलवर ती महिलांशी बोलताना पुरुष कशाप्रकारे चुका करतात हे ती सांगते. यावर तिचे 4 लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत.
25 जणांचा कर्मचारीवर्ग
केजियाकडे आता 25 जणांचा कर्मचारीवर्ग असून ते अनेक प्रकारचे डेटिंग वर्कशॉप आयोजित करतात. आतापर्यंत तिने 10 कोटी रुपयांहून अधिक कमाई केवळ स्वतःच्या उत्पादनांद्वारे केली आहे. माझे पुस्तक, डीव्हीडी, व्हिडिओ डाउनलोडद्वारेच 10 कोटी रुपयांहून अधिक कमाई झाली आहे. तर एक तासासाठी कोचिंग देत 30 हजार रुपयांचे शुल्क आकारत असल्याचे तिने सांगितले. कोरोनामुळे तिच्या व्यवसायावर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. परंतु तिने स्वतःचे अनेक कोर्स ऑनलाईन केले आहेत.