हॉलिवूडपटामध्ये अली फझल झळकणार
अभिनेता अली फझल बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील स्वतःचे स्थान निर्माण करू पाहतोय. फ्यूरियस 7 सारख्या चित्रपटांमध्ये विशेष भूमिका साकारलेला अली फझल लवकरच हॉलिवूडपट ‘डेथ ऑन द नाइल’लमध्ये दिसून येणार आहे. त्याने या चित्रपटाशी संबंधित पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. अलीच्या या पोस्टरला रीपोस्ट करत त्याची प्रेयसी ऋचा चड्ढा हिने अलीबद्दल प्रेम व्यक्त केले आहे.
अलीच्या या चित्रपटामधील लुकवर चाहत्यांकडून पसंतीची प्रतिक्रिया उमटत आहे. चाहत्यांसह पत्रलेखा आणि अनेक कलाकारांनी अलीला त्याच्या हॉलिवूड चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अली फजलने स्वतःच्या लुकसोबत अन्य कलाकारांचे पोस्टर्स देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अलीसह टॉम बेटमॅन, रसेल ब्रांड, डॉन प्रेंच, रोज लेस्ली, सोफी ओकोनेडो, जेनिफर साँडर्स आणि लेटिटिया राइट दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन केनेथ ब्रानघ यांनी केले आहे. अगाथा क्रिस्टी यांच्या डेथ ऑन द नाइल या नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे.