मनपाचे वाहन अडकले : आतातरी जाग येणार का?
प्रतिनिधी /बेळगाव
एसपीएम रोडशेजारी डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. मात्र रस्त्याचे काम व्यवस्थित करण्यात आले नसल्याने वाहने अडकण्याचे प्रकार सुरू आहेत. दररोज वाहने अडकण्याचे प्रकार सुरू असूनदेखील मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. सोमवारी मनपाचे कचरावाहू वाहन चरीत अडकले असल्याने आतातरी मनपाला जाग येणार का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
एसपीएम रोडशेजारी डेनेज वाहिन्या घालण्यासाठी व्यवस्थित रस्ता खोदण्यात आला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात आले होते. पण डेनेज वाहिन्या घालण्यासाठी पेव्हर्सदेखील हटविण्यात आले होते. डेनेज वाहिन्या घातल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती व्यवस्थित करण्याची गरज होती. पण रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. केवळ माती घालून चरी बुजविण्यात आल्याने याठिकाणी वाहने अडकण्याचे प्रकार सुरू आहेत. दररोज दुचाकी आणि चारचाकी वाहने अडकत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आले होते. सोमवारी सकाळी मनपाचे कचरावाहू वाहन अडकल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पेनच्या सहाय्याने सदर वाहन काढण्यात आले. पण अन्य वाहनधारकांना याचा धोका आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती व्यवस्थित करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.