लॅपटॉपची किंमत 1.60 लाख रुपयांपासून सुरु
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
डेल(Dell) कंपनीने भारतीय बाजारात आपले नवीन लॅपटॉप डेल एक्सपीएस 13 प्लस 9320 यांना सादर केले आहे. या लॅपटॉपमध्ये इंटेल 12 वी आवृत्ती जेन 28 डब्लू प्रोसेसर आहे. ज्याच्यासोबत एक्स्प्रेस चार्ज, आय सेफ टेक्नॉलॉजी आणि अगोदरच्या तुलनेत चांगल्या दर्जाचे स्पीकर मिळणार आहेत. डेलने या लॅपटॉपला प्रथमच सीइएस 2022 मध्ये सादर केले आहे.
डेल एक्सपीएस 13 प्लस 9320 या मॉडेलची किमत ही 1,59,990 रुपये आहे. एडीएल पी सीआय5-1240पी 12 कोर सोबत 16 जीबी रॅम आणि 512 जीबीचे हे मॉडेल आहे. यासोबत एडीएल-पी सीआय7-1260पी 12 कोर, 16 जीबी रॅमसोबत 1 टीबी स्टोरेज मिळणार असून याची किमत 1,79,990 रुपये आहे. सदरच्या लॅपटॉपची विक्री 23 जुलैपासून ऍमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाईटवर सुरु होणार आहे.
फिचर्स
- एक्सपीएस 13 प्लस 9320 मध्ये 13 इंचाचा फोर साइडेड इनफिनिटी एज अल्ट्रा एचडी प्लस डिस्प्ले
- लॅपटॉपमध्ये 12 व्या आवृत्तीचा जेन इंटेल कोर 28 डब्लू प्रोसेसर
- कॅपेसिटिव्ह टचसोबत लॅक्टिक कीबोर्ड व ग्लास टचपॅड मिळणार
- या लॅपटॉपमध्ये चार स्पीकरची सुविधाही मिळणार