मुंबई
सप्लाय चेन क्षेत्रातील कंपनी डेलहीवरी यांचा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. याकरीता परवानगीसाठी सेबीकडे कंपनीने अर्ज दाखल केला असल्याचे समजते.सदरच्या आयपीओतून कंपनी 7 हजार 400 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगण्यात येते. सेबीकडे आपली सविस्तर कागदपत्रे कंपनीने सादर केली आहेत. कंपनी 5 हजार कोटींचे नवे समभाग सादर करणार आहे. समभागधारकांना ऑफर फॉर सेलअंतर्गत 2 हजार 460 कोटी समभागांची विक्री करता येणार आहे. डेली सीएमएफ पीटीई 400 कोटी, सीए स्विफ्ट इन्वेस्टमेंटस 920 कोटी, एसव्हीएफ डोरबेल 750 कोटी आणि टाइम्स इंटरनेट 330 कोटी रुपयांचे समभाग विक्री करतील.