नवी दिल्ली
लॉजिस्टीक्स क्षेत्रातील कंपनी डेलिव्हरीने रिलायन्स समूह मालकीच्या अजियो यांच्यासोबत हातमिळवणी केली असल्याचे समजते. अजियो ही रिलायन्स समूहाची फॅशन, ऍप्पारल इ-कॉमर्स कंपनी आहे. या भागीदारीतून दोन्ही कंपन्यांना आगामी काळात चांगला फायदा उठवता येणार आहे. रिलायन्स अशा प्रकारची हातमिळवणी करत इ-कॉमर्स क्षेत्रात आपले पाय आणखी मजबुत करु पाहतो आहे.