ऑनलाईन टीम / लंडन :
प्रथम भारतात आढळलेल्या कोरोनाचा डेल्टा (1.617.2) हा व्हेरिएंट अल्फा किंवा केंट फॉरमॅटपेक्षा (व्हीओसी) 40 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या प्रसारामुळे ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे 21 जून रोजीचा नियोजित अनलॉक कठीण आहे, असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी रविवारी सांगितले.
कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या बहुतेक लोकांना लस देण्यात आली नाही. फारच कमी लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. कोरोनाच्या अल्फा प्रकारावर एक डोस परिणामकारक ठरतो. मात्र, डेल्टा प्रकाराला दोन्ही डोस घेतले असतील तरच बचाव होऊ शकतो, असेही हँकॉक यांनी म्हटले आहे.