कोलंबो : श्रीलंकेत 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान होणाऱया पहिल्या लंकन प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टीन कँडी टस्कर्स संघातर्फे खेळणार आहे.
कँडी टस्कर्स संघाच्या फ्रांचायजीने रविवारी वरील घोषणा केली. कँडी टस्कर्स संघामध्ये झिंबाब्वेचा फलंदाज बेंडॉन टेलरचाही समावेश आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना 26 नोव्हेंबरला कोलंबो आणि कँडी यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 23 सामने खेळविले जातील.