माद्रिद : डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत जोकोविचच्या शानदार कामगिरीच्या जोरावर सर्बियाने पाचव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. सर्बियाने डेव्हिस चषक लढतीत कझाकस्तानचा पराभव करून शेवटच्या चार संघात स्थान मिळविले.
2010 साली सर्बियाने डेव्हिस चषकावर आपले नाव कोरले होते. आता सर्बिया व क्रोएशिया यांच्यातील उपांत्य लढतीला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत टॉप सीडेड जोकोविचने एकेरीच्या सामन्यात कझाकस्तानच्या बुबलिकचा 77 मिनिटांच्या कालावधीत 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली होती. डेव्हिस चषक स्पर्धेच्या इतिहासात गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत जोकोविचने एकेरीचा एकही सामना गमावलेला नाही.