वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय डेव्हिस चषक संघाचे माजी प्रशिक्षक तसेच भारतीय टेनिस क्षेत्रातील महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखली जाणारे 83 वर्षीय अख्तर अली यांचे वृद्धापकालाने येथे निधन झाले. भारतीय डेव्हिस संघाचे विद्यमान प्रशिक्षक झिशान अली यांचे अख्तर अली हे वडील आहेत. अख्तर अली यांनी भारतीय टेनिस क्षेत्रातील अनेक अव्वल टेनिसपटूंना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले. लियांडर पेस, झिशान अली, विजय अमृतराज, रमेश कृष्णन यांना अख्तर अली यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले. अख्तर अली यांनी आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 1958 ते 1964 या कालावधीत आठ डेव्हिस चषक लढतीत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. भारतीय टेनिस फेडरेशनतर्फे अख्तर अली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली