बेळगाव /प्रतिनिधी
बेळगाव : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वजण मास्क-ग्लोव्जचा वापर करत आहेत. तसेच कोविड रुग्णांवर उपचार करताना सर्व डॉक्टर, नर्स मास्क व ग्लोव्ज, पीपीई किट परिधान करून रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र सर्व कर्मचारी या वापरलेल्या वस्तू इतरत्र टाकत असल्यामुळे येथील आसपासच्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
मंडोळी रोडवरील मून हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी, सिक्मयुरिटी गार्ड, नर्स, डॉक्टर आदी कर्मचारी आपली डय़ुटी झाल्यावर हॉस्पिटलच्या बाहेरील रस्त्यावर व गटारीत मास्क, ग्लोव्ज टाकत आहेत.
येथील परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता येथील भाजीविपेत्यांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले. मात्र आता डॉक्टरांचाच बेजबाबदारपणा यातून दिसून येत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करून वापरण्यात आलेले मास्क व ग्लोव्ज इतरत्र फेकण्यात येत असल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमधील कर्मचाऱयांनी योग्य ती खबरदारी घेऊन वापरलेल्या साहित्याची योग्य विल्हेवाट लावावी. परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.