डॉ. वेंकट चलपती यांचे प्रतिपादन, बेळगावमधील नामांकित डॉक्टरांचा सत्कार
प्रतिनिधी /बेळगाव
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ही संघटना स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना आपले अनुभव नवीन तंत्रज्ञान यांची माहिती मिळविण्यासाठी ही संघटना महत्त्वाची भूमिका बजावते. ज्या-ज्या वेळी डॉक्टरांवर संकटे आली त्या-त्यावेळी आयएमए तत्परतेने पुढे आली आहे, असे प्रतिपादन आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. एम. वेंकट चलपती यांनी केले.
आयएमए बेळगाव शाखेच्यावतीने हॉटेल आदर्श येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर बिम्सचे संचालक डॉ. आर. विवेकी, आयएमए बेळगावचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. देवगौडा उपस्थित होते. या कार्यक्रमात बेळगावमध्ये उत्कृष्ट सेवा दिलेल्या ज्ये÷ डॉक्टरांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. दिलीप पठाडे, डॉ. सुहास मांजरेकर, डॉ. प्रकाश मल्लूर, डॉ. पी. व्ही. हवालदार व डॉ. मीना दीनानाथ पाटील यांचा आयएमएच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मानचिन्ह, म्हैसुरी पगडी देऊन डॉक्टरांच्या कार्याचा गौरव झाला. सत्काराला उत्तर देताना डॉ. दिलीप पठाडे यांनी आयएमएचे आभार मानून यापुढेही अशीच सेवा देत राहू, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी डॉ. रविंद्र अनगोळ, डॉ. मिलिंद हलगेकर, डॉ. राजश्री अनगोळ, डॉ. स्वप्ना महाजन यांच्यासह आयएमएचे सदस्य उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाने आणली रंगत
रोजच्या वैद्यकीय सेवेतून विरंगुळा मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कराओकेच्या माध्यमातून अनेक डॉक्टरांनी सदाबहार गीते सादर केली. डॉ. दिलीप पठाडे यांनी सादर केलेल्या नाटय़गीताला डॉक्टरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नृत्य व लहान नाटय़प्रसंग सादर करण्यात आले.