काळय़ा फिती लावून करणार काम : फेसबुकवर प्रक्षोभक भाष्य करणाऱयांवर कारवाईची मागणी
प्रतिनिधी / ओरोस:
फेसबूकच्या माध्यमातून डॉक्टरांविरुद्ध प्रक्षोभक व चिथावणीकारक वक्तव्य करून जिल्हय़ामधे अशांतता पसरविण्याचा तसेच अत्यावश्यक सेवेत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱयांवर कडक करवाई करावी, अशी मागणी डॉक्टर प्रॅटर्निटी क्लबने गुरुवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
मालवण येथील रेडकर डॉक्टरांबाबत घडलेल्या या कृत्याचा निषेध म्हणून जिल्हय़ातील डी. एफ. सी. संघटनेचे सर्व डॉक्टर 2 मे रोजी काळय़ा फिती लावून काम करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मालवण येथे डॉ. विवेक रेडकर यांचे रुग्णालय आहे. त्यांनी अनेक वर्षे रुग्णसेवा केली आहे. कोविड-19 या साथीच्या रोगाच्या काळातही ते सेवा देत आहेत. दरम्यान सर्वच खासगी डॉक्टर जीवाची पर्वा न करता वैद्यकीय सेवा प्रामाणिकपणे व सातत्याने पुरवित आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
या काळात सार्वजनिक शांतता भंग होऊ नये किंवा प्रक्षोभक वक्तव्य करू नये किंवा वैद्यकीय सेवेत अडथळे निर्माण करू नये व वैद्यकीय सेवा पुरविणाऱयांना कोणताही त्रास देण्याचे कृत्य नागरिकांनी करू नये, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र मनोज खोबरेकर, रा. देवबाग, यांनी त्यांच्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून डॉ. रेडकर यांच्याविरुद्ध व त्यांच्या हॉस्पीटलबाबत खोटी, बदनामीकारक व प्रक्षोभक वक्तव्य असलेली माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यावर दिलीप घारे व प्रदीप गावकर यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून दुजोरा देणारा अभिप्राय देऊन त्यांना साथ दिली आहे. याबाबत मालवण पोलिसात डॉ. रेडकर यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अशा कृतीमुळे वैद्यकीय सेवा देणाऱयांना व त्यांच्या स्टाफला धोका निर्माण झाला आहे, याकडे डॉक्टर प्रॅटर्निटी क्लबच्या पदाधिकाऱयांनी गुरुवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेत लक्ष वेधले. तसेच निवेदनही सादर केले.
सध्या राज्य शासनाने खासगी डॉक्टरांना त्यांचे दवाखाने, हॉस्पीटल सुरू ठेवून वैद्यकीय सेवा पुरविणे सक्तीचे केले आहे. सिंधुदुर्गातील डॉक्टर ही सेवा नियमित देत आहेत. परंतु अशा समाज कंटकांच्या कृत्यामुळे डॉक्टरांच्या जीवितास धोका निर्माण होणार असेल, तर रुग्णसेवा देणे शक्मय होणार नाही. त्यामुळे या घडलेल्या प्रसंगाचा गांभीर्यपूर्वक विचार करून आपण संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. समाजातील विकृत मानसिकतेला वचक बसून अशा कृत्यांना पायबंद घातला जावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, सेपेटरी डॉ. सुहास पावसकर, असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाचे डॉ. शंतनु तेंडुलकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय केसरे, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. संदीप नाटेकर आदी उपस्थित होते.