ऑनलाईन टीम / पुणे :
‘झी युवा’ वाहिनी, ‘डॉक्टर डॉन’ नावाची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आहे. ही मालिका हलकीफुलकी आणि विनोदी धाटणीची असणार आहे. या मालिकेतून, अभिनेता देवदत्त नागे छोटय़ा पडद्यावर पुनरागमन करत आहे. तो एका निराळय़ा भूमिकेत आणि खास लुकमध्ये दिसणार आहे. नुकताच पहिला टिझर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना याची झलक पाहायला मिळालेली आहे.
देवदत्त नागे एका वेगळय़ा भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याच्या पुनरागमनाविषयी असलेली उत्सुकता अधिक वाढलेली आहे. प्रोमोमध्ये देवदत्त नागे एका गुंडाच्या मागे धावताना दिसतो आहे. त्याच्या हातात एक पिस्तुल आहे. त्याच्या हातातील पिस्तुल अचानक अदृश्य होते व त्या जागी स्टेथस्कोप दिसू लागतो. त्याचप्रमाणे त्याच्या अंगावरील कोट पांढऱया लॅबकोटमध्ये परावर्तित होतो, असे या प्रोमोमध्ये दिसते.
देवदत्तने जपलेल्या पोनीटेलमुळे, त्याचा लुक एकदमच झकास दिसत आहे. हा डॉक्टर डॉन कशाप्रकारे हास्यउपचार आणि विनोदाचे फायरिंग करतो, ते पाहण्याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिलेली आहे.