ऑनलाईन टीम / हैदराबाद :
जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. भारतात देखील कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत देखील डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करत आहेत. असे असून सुद्धा काही नागरिक याच लोकांवर हल्ले करत आहेत.
या घटनेचा निषेध दर्शवत भारताचा माजी क्रिकेटर महमंद अझरुद्दीन याने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तो म्हणाला, जे लोक पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस यांच्यावर हल्ले करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. डॉक्टर स्वतः हा व्यवसाय निवडताना ते इतरांचा जीव वाचवणार अशी शपथ घेतात. ते त्यांचे काम करत आहेत.अशा वेळी जर कोणी त्यांच्यावर हल्ला करत असेल तर मात्र हल्ला करणाऱ्या लोकांना अधिकाधिक कठोर शिक्षा झालीच पाहिजे. असे केले तरच या लोकांना समज येईल. असं अझरुद्दीन याने म्हटले आहे.
तसेच त्याने यावेळी सरकारच्या नियमांचे पालन करा तसेच घराबाहेर पडू नका असे आवाहन देखील केले आहे.