एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱया अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. हि मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील सरू आज्जी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही आणि अशी अनेक पात्रं प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत.
देवी सिंगला शोधण्यासाठी दिव्या साम दाम दंड भेद ही सगळी अस्त्र वापरतेय, दिव्या हुशारीने अजितचे फिंगरप्रिंट्स मिळवते. रेश्माच्या घरातल्या तिसऱया व्यक्तीच्या फिंगरप्रिंटसोबत अजितचे फिंगरप्रिंट मॅच होतात. त्यामुळे दिव्याला प्रत्येक केसमध्ये असलेल्या व्यक्ती कुठल्या प्रकारे अजितच्या संपर्कात आल्याचं लक्षात येतं. त्यामुळे डॉ. अजित कुमार देवला कधी अटक करणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय.