शिराळा च्या वैभवात मानाचा तुरा.
प्रतिनिधी / शिराळा
इंडो – युके कल्चर फोरम लंडन ( इंग्लड ) यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा (२०२१ ) भारत गौरव सन्मान डॉ . अभिजित जोशी. यांना मिळाला आहे. डॉ . जोशी सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आणि आयुर्वेद आणि योग विद्याशाखेचे अधिष्ठाता आहेत.
हा गौरव सन्मान सोहळा ब्रिटिश संसदेत पार पडणार आहे. भारत आणि इतर देशांच्या संस्कृतीच्या सवंर्धनाचे काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.डॉ. अभिजित जोशी हे मुळचे ३२ शिराळा येथील आहेत.