जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱया संबंधित वाहिनीवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आला आहे. एका कन्नड वाहिनीवर मालिका दाखविण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाला आहे. तेंव्हा ती मालिका रद्द करावी तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विद्या लक्कोळी, गोपी बळ्ळारी, रवी कांबळे, विलास मारिहाळ, राहुल लक्कोळी, अलिद खान यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.